You are currently viewing शेतकरी उत्पादक कार्यशाळेस सुरेश प्रभूंचं मार्गदर्शन..!

शेतकरी उत्पादक कार्यशाळेस सुरेश प्रभूंचं मार्गदर्शन..!

सिंधुदुर्गनगरी

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व लुपिन फाऊनडेशन, सिधुदुर्ग स्थापित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात कंपनींच्या संचालक व सी इ ओ साठी कार्यशाळेचे आयोजन कुडाळ मराठा समाज हॉल येथे दिनांक ३ जानेवारी २०२१ रोजी करण्यात आले. या कार्यशाळेला सुरेश प्रभूसाहेब शेर्पा भारत सरकार यांनी विशेष मार्गदर्शन केले. नाबार्ड, लुपिन फाऊनडेशन, सिंधुदुर्ग मार्फत शेतकर्यासाठी स्थापन केलेल्या कंपनीच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांना अपेक्षित असलेला ग्रामीण विकास खऱ्या अर्थाने साध्य करू शकतो असे गौरव उद्गार काढले.

शेतक-याना  प्रशिक्षण देऊन नवीन तंत्रज्ञान शिकवणे गरजेचे आहे. यासाठी परिवर्तन केंद्रांच्या माध्यमातून शेतकरी आणि मच्छीमार समाज बांधव यांना नवीन तंत्रज्ञान विषयीक प्रशिक्षण दिल्यास निसर्गाशी समतोल साधून विकास प्रक्रिया पुढे जाऊ शकते. कारण शेतक-याबरोबरच मच्छीमार बांधव हे निसर्गावर अवलंबून असतात. त्यांना निसर्गाशी सुसंगत असे तंत्रज्ञान प्रशिक्षण मधून दिल्यास विकास प्रक्रीयेतीन सुवर्णमध्य साधता येईल. आपल्या कोकणातील शेतकरी मानाने भक्कम व जिद्दी आहे. त्यामुळे कोकणातील शेतकरी आत्महत्या करत नाही, त्याला नवीन तंत्रज्ञान दिले तर ग्रामीण विकास प्रक्रियेत क्रांती होईल. नाबार्ड व लुपिन च्या माध्यमातून सात कंपन्या स्थापन करूंन सप्तदर्शी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हे कौतुकास्पद आहे असे गौरोउद्गार काढून सुरेश प्रभूसाहेबांनी कंपनीच्या कार्यास शुभेच्या दिल्या. या कार्यक्रमास मा. उमा प्रभू अध्यक्षा मानव साधन विकास संस्था, राजन तेली माजी आमदार, मा. अजय थुटे डी डी एम नाबार्ड, मा.योगेश प्रभू प्रोजेक्ट मॅनेजर लुपिन फाऊनडेशन, सिंधुदुर्ग, अतुल काळसेकर, नकुल पार्सेकर, विजय केनवडेकर विलास हडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मा.थुटे साहेब यांनी नाबार्ड व लुपिन च्या विविध उपक्रमांचा आढावा घेत सुवर्णक्रांती, ॲग्रीकार्ड, कोकणवन, कृषी कोकण, प्रवण, माणगांव खोरे बांबू व सुतार समाज आदी कंपन्याची कार्यप्रणाली विषद केली. या कार्यशाळे मध्ये  पदमसिंह पाटील (सी एस कोल्हापूर) आणि सुधीर नाईक ( सी ए ) यांनी कंपनीच्या आर्थिक बाबी विषयी विशेष मार्गदर्शन करून कंपनी चालवताना कोणती काळजी घ्यावी तसेच कोणकोणते धोके निर्माण होऊ शकतात याविषयी माहिती दिली.

नंतरच्या सत्रामध्ये सातही कंपनीच्या संचालकांनी आपापल्या कंपन्याची सध्या स्थिती आणि पुढील नियोजनाबाबत माहिती दिली.सदर कार्यक्रमाला लुपिन फौंडेशन चे अधिकारी संतोष कुडतरकर, नारायण कोरगावकर, अजित देसाई यांनी कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. तसेच नारायण परब यांनी सूत्र संचालन व आभार मानले

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 3 =