You are currently viewing मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेसाठी आवश्यक असलेला निधी देऊ – अजित पवार यांचे आश्वासन

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेसाठी आवश्यक असलेला निधी देऊ – अजित पवार यांचे आश्वासन

राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद…

सावंतवाडी

येथे होणाऱ्या नियोजित मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलला जागा संपादित करण्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल,असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला दिले. निधीअभावी व जागेअभावी येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रेंगाळले आहे. त्यामुळे त्यासाठी आवश्यक असलेला निधी देण्यात यावा,अशी मागणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी पुंडलिक दळवी,देवा टेमकर व अर्चना घारे यांनी आज श्री अजित पवार यांच्याकडे केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा