*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या ज्येष्ठ सदस्या लेखिका कवयित्री डॉ.निलांबरी गानू यांची अप्रतिम काव्यरचना*
*🌸तुज सांगते सखी 🌸*
पुष्प ७
*माय मराठी*
माय मराठी झळके
जगी यशकीर्तिनी
क्षितिजी घेई मराठी
झेप विज्ञान पंखांनी
तुझ्यासवे माय झाले
आहे अक्षर सुंदर
वाचणे चालणे झाले
बोलण्याने कलंदर
कर्तृत्वाच्या विश्वासाने
अविचल श्रद्धा भक्ती
दैवाशी देण्या टक्कर
माय मराठीची उक्ती
माय मराठीचा शिष्य
असतो परोपकारी
तसाच तो जगमित्र
अन असतो निर्मत्सरी
माय मराठीवर श्रद्धा
मग मिळेल ज्ञान
नित्य सावध संयमी
शांती सुखाचे ध्यान
माझी माय मराठी ग
शाशीसमान शीतल
रविसमान तेजस्वी
भुमीपरी क्षमाशील
पाऊल मराठी पुढे
थिटे अथांग आभाळ
झगमगे तरुणाई
नभी दिव्याची माळ
निलांबरी गानू
राजगुरूनगर
पुणे 7741894421