You are currently viewing जगद्गुरु शंकराचार्यांना वंदन”

जगद्गुरु शंकराचार्यांना वंदन”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य लेखक कवी गायक गीतकार संगीतकार श्री अरुण गांगल लिखित अप्रतिम गीत रचना*

*”जगद्गुरु शंकराचार्यांना वंदन”*

जगद्गुरु शंकराचार्यांना करू वंदन
चारही पिठांचे विश्वासाठी बहु योगदानIIध्रुII

आद्य शंकराचार्य जन्मले कलाडीं केरळांत
माता आर्यम्बा पिता शिवगुरु होते शिवभक्त
मातेने शिकविले शंकरांस वेदोपनिषदII1II

हिंदू संस्कृतीचे आहेत प्रणेते रक्षक
भारताचे चार दिशांचे धर्म प्रतिपालक
देती सर्वांना सुविचार अभय वरदानII2II

दंडधारी पाळती धर्मासाठी संन्यासी व्रत
विश्व काळजी वाहती करती जन जागरण
शिव कृष्ण उपासना ध्येय शिकविती वेदांतII3II

पूर्वेला गोवर्धन पीठ शारदा पश्चिमेला
उत्तरेला ज्योतिष पीठ शृंगेरी दक्षिणेला
वांछिती समाज उन्नती देती ऊर्जा चैतन्यII4II

शंकराचार्य वेदशास्त्र संपंन्न निपुण
ब्रह्मसूत्रे उपनिषदांवर लिहिला भाष्य ग्रंथ
लिहिले संन्यास प्रणाली मठान्मय ग्रंथII5II

अद्वैत सिद्धांताने केले धर्माचे संजीवन
विवेक चुडामणीने शिकविले भक्ती ज्ञान
रचिले नर्मदाष्टकम् करती षड्धर्मांचे पूजनII6II

समाज राहावा एकोप्यानं करिती चिंतन
स्वीकारती हिंदू धर्मात सर्वांस सहृदयतेनं
देती शिकवण व्हावे मानवतेंचे कल्याणII7II

नित्य वेद पठण शिकवती सर्वां विद्यार्जन
सदा रहाती निष्पक्ष वागती निती न्यायानं
स्मरूया त्यांचे ऋण राखूया सर्वांचा सन्मानII8II

काव्य:श्री अरुण गांगल कर्जत.रायगड.
महाराष्ट्र.पिन.410201.
Cell.9373811677.

 

🎋🎋🌾🌾🌴🌴🌱🌱🎋🎋🌾

*_शेतकरी, कष्टकरी बांधवांसाठी एक छोटीशी मदत_*

*_🥭🌴आंबा, नारळ, सुपारी,आणि काजू साठी अत्यंत गरजेची असणारी उत्पादने_*

*🎋🌴🌾 Maharashtra agro fertilizer and chemicals* 🎋🌴🌾
*kolhapur*

*_👉डायरेक्ट फॅक्टरी दरांमध्ये, उपलब्ध._*
*_👉मधल्या कुठल्याच मेडीयटरचा समावेश नसल्यामुळे कमी दरांमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे सेंद्रीय खत उपलब्ध_*
*_👉 कल्पवृक्ष आणि निंबोळी पावडर संतुलन ऑर्डर नुसार पोहच करण्याची व्यवस्था_*

*🔹जमिनीच्या सुपीकते बरोबरच उत्पन्नात देखील भरघोस वाढ*

*🔸पिकांची उत्तम वाढ*
*🔹 रोग प्रतिकारक शक्ती वाढते*
*🔸जमिनीचा सामू समान ठेवण्यास मदत*
*🔹 पानांचा व फळांचा आकार वाढतो*
*🔸फळे मोठी होणे*
*🔹प्रकाश संश्र्लेशन कार्य वाढवते.*
*🔸निरोगी आणि विषमुक्त पिके*

*👉आजच संपर्क करा*

*Maharashta agro fertilizer and chemicals.kolhapur.*

*📲9823857786*
*📲8208657954*

*Advt web link 👇*

———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + nineteen =