You are currently viewing अटल प्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न अटलजींच्या अभिवादन.

अटल प्रतिष्ठानच्या वतीने भारतरत्न अटलजींच्या अभिवादन.

भारतीय राजकारणातील पारदर्शी आणि पथदर्शी नेते, अभ्यासू आणि चिंतनशील वक्ते, उत्कृष्ट संसदपटू, राष्ट्र उभारणीसाठी सर्वसमावेशक भूमिका घेणारे अजातशत्रू, भारतीय संविधानाचा सन्मान करणारे प्रखर राष्ट्रभक्त भारतरत्न आदरणीय अटलजींचा जन्मदिन अटल प्रतिष्ठानच्या वतीने साजरा करण्यात आला. अटल प्रतिष्ठान संचलित शिशुवाटिका विभागाच्या वतीने लहान शिशुनी अटलजींच्या तस्वीरिला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. नकुल पार्सेकर, शिशुवाटिका विभागाच्या व्यवस्थापिका डाॅ. सौ. रश्मी कार्लेकर, संस्कृत भारतीचे श्री प्रसाद कार्लेकर, प्रधानाचार्या श्रीमती विजया रामाणे, आचार्यां सौ. रसिका भराडी, सौ. सायली सरमळकर,सौ.परब, श्रीमती मानसी मोरजकर, चाईल्ड लाईनचेअॅड. चिन्मय वंजारी, श्रीमती प्रज्ञा जाधव, कु.पुनम पार्सेकर आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा