You are currently viewing पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरवाढी विरोधात उद्या कुडाळ येथे शिवसेनेचे आंदोलन…

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरवाढी विरोधात उद्या कुडाळ येथे शिवसेनेचे आंदोलन…

कुडाळ

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरवाढी विरोधात शिवसेनेच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार असून कुडाळ मालवण मतदारसंघाच्या वतीने उद्या शुक्रवार दि. ५ फेब्रुवारी २०२१ रोजी कुडाळ शिवसेना शाखा येथे सकाळी ११ वाजता हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन होणार आहे.त्यानंतर कुडाळ तहसीलदारांना याबाबतचे निवेदन देण्यात येणार आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, बबन शिंदे, जि. प. गटनेते नागेंद्र परब, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, कुडाळ उपसभापती जयभारत पालव, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, विकास कुडाळकर,अतुल बंगे,मंदार केणी उपस्थित राहणार आहेत.


तरी या आंदोलनाला कुडाळ मालवण तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसेना जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य,नगरसेवक, सरपंच, व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, महिला आघाडी तालुकाप्रमुख स्नेहा दळवी, मथुरा राऊळ, युवासेना तालुकाप्रमुख राजू जांभेकर,शहरप्रमुख संतोष शिरसाट, तसेच मालवण शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख श्वेता सावंत, दीपा शिंदे, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, शहरप्रमुख बाबी जोगी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − sixteen =