You are currently viewing पणदूर महाविद्यालयात “थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन” यांचा जन्मदिवस “राष्ट्रीय गणित दिवस” म्हणून साजरा

पणदूर महाविद्यालयात “थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन” यांचा जन्मदिवस “राष्ट्रीय गणित दिवस” म्हणून साजरा

पणदूर :

वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूरतिठा या प्रशालेत दिनांक 22 डिसेंबर “थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन” यांचा जन्मदिवस “राष्ट्रीय गणित दिवस” म्हणून साजरा करण्यात आला. या राष्ट्रीय गणित दिवसाच्या निमित्ताने प्रशालेतील विद्यार्थ्यांनी गणित विषयातील विविध संकल्पना रांगोळीच्या स्वरूपात सादर केल्या. रांगोळी व आकृत्यांमधून गणित विषय अधिक सोपा व आकर्षक कसा वाटेल यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी रांगोळी प्रदर्शन व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली. या रांगोळी स्पर्धेचे उद् घाटन संस्था चेअरमन माननीय श्री. शशिकांत अणावकर सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उत्तम नियोजनासाठी श्री. अणावकर सर यांनी सर्वांचे कौतुक केले. याप्रसंगी संस्था संचालक व प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. एम. एस. पाटील सर, मुख्याध्यापक श्री. एम. जी. कर्पे सर, उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री. संजय गांवकर सर तसेच गणित शिक्षक श्री. एस. एम. ज्योती, सौ. पी. एम. राठोड, श्री. आर. झेड. बागुल, श्री. डी. ए. हेबाळकर आणि इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा