You are currently viewing लेखक आणि दिग्दर्शक सिद्धेश शिंदे ह्यांच्या अवनी आणि डोन्ट बी ऑकवर्ड ह्या दोन्ही लघुपटाना पुरस्कार जाहीर

लेखक आणि दिग्दर्शक सिद्धेश शिंदे ह्यांच्या अवनी आणि डोन्ट बी ऑकवर्ड ह्या दोन्ही लघुपटाना पुरस्कार जाहीर

मुंबई प्रतिनिधी :

 

संस्कृती एन्टरटेन्मेंट निर्मित अवनी आणि डोन्ट बी ऑकवर्ड ह्या दोन्ही लघुपटाना द बेस्ट फ्रेम फिल्म फस्टिव्हलमध्ये पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ह्या लघुपट महोत्सवामध्ये देश, विदेशातून १००० पेक्ष्या अधिक चित्रपट आले होते, त्यापैकी ३०० चित्रपट हे अधिकृतपणे निवडले गेले होते, त्यात लेखक आणि दिग्दर्शक ह्यांनी केलेल्या अवनी आणि डोन्ट बी ऑकवर्ड, डोन्ट बी कॅरलेस ह्या लघुपटाची अधिकृतपणे निवड झाली होती, त्यात अवनी हा लघुपट सर्वोत्कृष्ट कथा म्हणून विजयी झाला असून तर डोन्ट बी ऑकवर्ड ह्या लघुपटला सर्वोत्कृष्ट संकल्पनात्मक चित्रपट म्हणून विजयी करण्यात आले आहे.

अवनी आणि डोन्ट बी ऑकवर्ड हे दोन्ही लघुपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक चित्रपट महोत्सवमध्ये अधिकृतपणे निवड होत आहे, २०२१ मध्येच झालेल्या लिफ्ट ऑफ ग्लोबल नेटवर्क ( United Kingdom ) येथे पार पडलेल्या लघुपट महोत्सवामध्ये ही अधिकृत निवड करण्यात आली होती.

ह्या दोन्ही लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सिद्धेश शिंदे ह्यांनी केले आहे. तर अवनी ह्या लघुपटात वैष्णवी पोतदार हिने अवनी ह्या मुलीची प्रमुख भूमिका साकारलेली आहे आणि सहकलाकार म्हणून नागेश बल्लाळ ह्याने काम केले आहे, तर डोन्ट बी ऑकवर्ड मध्ये सिद्धेश शिंदे ह्यांची प्रमुख भूमिका आहे, दोन्ही लघुपटाचे, संगीत आणि संकलन चिन्मय शिवलकर ह्याने केले असून, अवनी ह्या लघुपटाचे छाया चित्रीकरण प्रसन्न पिंगे ह्याने केले आहे.

लघुपटाच्या विजयाचे सर्व श्रेय हे ह्या लघुपटात काम केलेल्या कलाकार, सहकलाकार, तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या सर्वांना जात आहे, त्यामुळे हे विजेते पद संस्कृती एन्टरटेन्मेंटच्या टीमचे आहे, आपल्या सर्वांचे, रसिक प्रेक्षकांचे आणि ज्युरी सदस्यांचे मनापासून धन्यवाद असे लेखक आणि दिग्दर्शक ह्यांनी मुलाखतीत सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा