देवगड
भजन सम्राट दीपक चव्हाण यांचे दीर्घ आजाराने मुंबई येथे शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता निधन झाले त्यांच्या जाण्याने भजन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याने अनेकांनी दुःख व्यक्त केले.
देवगड तालुक्यातील शिरगाव आंबेखोल या गावचे ते सुपुत्र होतेदीपक चव्हाण यांनी भजन क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा निर्माण केला होता त्यांनी अनेक दिग्गज भजनीबुवान बरोबर रंगतदार डबलबारी सादर करून नेहमीच भजन रसिकांना आपलेसे केले होते.
त्यांनी भजनांच्या विविध ध्वनिफिती देखील काढल्या होत्या त्याला देखील भजन रसिकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला होता. आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवले आजच्या विद्यार्थ्यांनी भजन सम्राट दीपक चव्हाण यांच्या शिकवणीतून आपली कला सादर करताना दादही मिळत असल्याने शिष्यांना आपल्या गुरु बद्दल अभिमान देखील तितकाच वाटत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,एक मुलगा असा परिवार आहे.