You are currently viewing 12 वीची परीक्षा 4 मार्च पासून तर 10 वीची परीक्षा 15 मार्च पासून

12 वीची परीक्षा 4 मार्च पासून तर 10 वीची परीक्षा 15 मार्च पासून

सिंधुदुर्गनगरी

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमच्या लेखी परीक्षा शुक्रवार दि. 4 मार्च 2022 ते दि.30 मार्च  2022 रोजी तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मंगळवार दि. 15 मार्च 2022 ते दि.4 एप्रिल 2022 या कालावधीत  होणार आहेत. मार्च -एप्रिल 2022 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ.12 वी व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इ.10 वी लेखी परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in या संकेस्थळावर दि. 21 डिसेंबर 2021 पासून उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

                         मंडळाच्या संकेतस्थावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांचकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. छापील वेळापत्रकावरुन परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सॲप किंवा तत्सम माध्यमातून प्रसारित झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये. प्रात्यक्षिक परीक्षा श्रेणी, तोंडी परीक्षा, व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षांपूर्वी मंडळामार्फत शाळा,कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल. तरी सर्व संबंधितांनी यांची नोंद घ्यावी. असे डॉ.शिवलींग पटवे  विभागीय सचिव कोकण विभागीय मंडळ  हे कळवितात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 5 =