You are currently viewing रघुनाथ खानोलकर यांचा भाजपातर्फे सत्कार

रघुनाथ खानोलकर यांचा भाजपातर्फे सत्कार

वेंगुर्ला

आडेली जिल्हापरिषद मतदार संघातील खानोली ग्रामपंचायतीच्या वार्ड क्र. २च्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार रघुनाथ उर्फ अण्णा खानोलकर यांनी ९९ मते मिळवित शिवसेना उमेदवार रुपाली किरण प्रभूखानोलकर यांचा पराभव केला. त्याबद्दल भाजपाच्या वेंगुर्ला तालुका कार्यालयात तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते रघुनाथ खानोलकर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर, खानोली सरपंच प्रणाली खानोलकर, उपसरपंच सुभाष खानोलकर यांच्यासह भाजपाचे बाळा सावंत, दादा केळुसकर, बाबली वायंगणकर, प्रशांत आपटे, नितीन चव्हाण, सुनिल घाग, प्रथमेश सावंत, राधाकृष्ण खानोलकर, अरुण खानोलकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा