You are currently viewing कुडाळ नगरपंचायतीच्या उर्वरित चार जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर…

कुडाळ नगरपंचायतीच्या उर्वरित चार जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर…

कुडाळ

येथील नगरपंचायतीच्या उर्वरित चार जागांसाठीची आरक्षण सोडत प्रक्रिया आज पार पडली. यावेळी संबंधित चारही जागांवर सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे या चार जागांवर निवडणूक झाली नव्हती. तर यापूर्वी लढविण्यात आलेल्या चार जागा “ओबीसी” साठी आरक्षित होत्या.
आज पार पडलेल्या आरक्षण सोडतीत लक्ष्मीवाडा व केळबाईवाडी सर्वसाधारण महिला जागेसाठी आरक्षित झाली आहे. तर एमआयडीसी व संगीरडेवाडी सर्वसाधारण जागेसाठी राखीव आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा