You are currently viewing संध्याकाळ

संध्याकाळ

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या कवयित्री सौ.आदिती मसुरकर यांची काव्यरचना

शिरोमणी काव्य

संध्याकाळ
मोहक हसणारी
अस्ताला जाणाऱ्या रवीस
अलगत आपल्या कवेत घेणारी

संध्याकाळ
किनार्‍यास लुभवणारी
तांबूस निळसर छटांनी
लाटांच्या लहरींवर विराजमान होणारी

संध्याकाळ
मनमुराद बरसणारी
हवेत गारवा पसरून
उनाड वाऱ्यासवे गीत गाणारी

संध्याकाळ
चमचम चमकणारी
चंद्राच्या शीतल छायेत
आठवांच्या झुल्यावर मजेत झुलणारी

*✒️©सौ आदिती मसुरकर*
*कुडाळ जि.सिंधुदुर्ग*

प्रतिक्रिया व्यक्त करा