You are currently viewing मनाच्या तळाशी

मनाच्या तळाशी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य कवयित्री डॉ.दक्षा पंडित लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मनाच्या तळाशी*

*षडाक्षरी*

 

मनाच्या तळाशी

आठवांची खाण

खोलात शिरता

होतसे हैराण……१

 

मन हे इंद्रिय

असते अस्थिर

मनाच्या तळाशी

क्षणभर स्थिर……२

 

मनाच्या तळाशी

गवसले क्षण

आनंद,हर्षाने

वेडावले मन……३

 

सुखद क्षणांची

बांधूयात मोळी

दु:खद क्षणांची

करायची होळी……४

 

मनाच्या तळाशी

साचलेला गाळ

उपसुनी त्यास

करू मोठा जाळ……५

 

मनाचा आरसा

असता प्रांजळ

गरळ काढता

तळी हिरवळ……६

 

मन मंदिरात

असता मंगल

मनाचा तळाशी

नसे अमंगल……७

 

मनाचा गाभारा

ठेवता निर्मळ

मनाचा तळही

दिसेल नितळ……८

 

डॉ दक्षा पंडित

दादर,मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा