You are currently viewing निसर्गचक्रीवादळाच्या नुकसानभरपाई मिळालेल्या २५ कोटी पैकी २५ लाख सुद्धा पोचले नाहीत-रणजित देसाई

निसर्गचक्रीवादळाच्या नुकसानभरपाई मिळालेल्या २५ कोटी पैकी २५ लाख सुद्धा पोचले नाहीत-रणजित देसाई

कृषी समिती सभा; गटनेते रणजित देसाई यांच्या आरोप

पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यपद्धतीचा निषेध..!

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी

निसर्ग चक्री वादळाच्या नुकसानभरपाई पोटी सिंधुदुर्गाला मिळालेल्या २५ कोटी पैकी नुकसानग्रस्तांना पर्यंत २५ लाख सुद्धा पोचले नसल्याचा आरोप गटनेते रणजित देसाई यांनी करत पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यपद्धती चा निषेध केला. नाम उदय सामंत हे रत्नागिरीचे असल्यामुळे व रायगड जिल्ह्यात तटकरे असल्यामुळे तेथे भरघोस निधी मिळतो परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्याला वाली कोण? असा प्रश्न उपस्थित करत पालकमंत्री उदय सामंत यांना लक्ष केले.

जिल्हा परिषद कृषी समिती सभा ऑनलाइन द्वारे बुधवारी सकाळच्या सत्रात जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती राजेंद्र म्हापसेकर यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी समिती सचिव तथा कृषि विकास अधिकारी सुनील चव्हाण, सदस्य गटनेते रणजित देसाई, गणेश राणे, संजय देसाई, सुधीर नकाशे, महेंद्र चव्हाण, अमरसेन सावंत उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला या महिन्यात निधन झाले भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांचे आई वडिल व जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष मधुसूदन बांदिवडेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २५ कोटीचे पॅकेज जाहीर केले जुलै महिन्यात याची घोषणा ही झाली मात्र यापैकी २५ लाख सुद्धा नुकसानग्रस्तांना पर्यंत पोहोचले नसल्याचा आरोप गटनेते रणजित देसाई यांनी केला पालकमंत्री उदय सामंत हे मूळ रत्नागिरी जिल्ह्याचे आहेत त्यामुळे ते रत्नागिरीला झुकते माप देणार आपल्या जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे दोन आमदार, एक खासदार असूनही जिल्ह्याला वाली कोणीही नसल्याचा आरोपही देसाई यांनी केला. सदस्य सुधीर नकाशे यांनीही प्रशासनावर आगपाखड करत दिलेल्या नुकसानीबाबत नाराजी व्यक्त केली. वैभववाडी तालुक्यामध्ये या चक्रीवादळामुळे पडझड झालेल्या झाडांच्या बदल्यात छोटी रोपे देऊन शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचा आरोप नकाशे यांनी केला. २० वर्षापूर्वीचे आंबे, साग, फणस अधिक उत्पन्न देणारी झाडे वाटप केलली रोप देऊ शकतात का? असा सवाल करत शेतकऱ्यांना झाडाची किंमत मिळावी अशी मागणी केली.

राज्याच्या आघाडी सरकारने नावाखाली जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागाचा जवळपास ३३ टक्के निधी कपात केला पायाभूत पायाभूत सुविधांवर होणारा निधी कपात करा परंतु कृषी व आरोग्य विभागाचा निधी कपात करू नये अशी सूचना सदस्यांनी मांडली जिल्ह्यात काही ठिकाणी ढगफुटी सारखा पाऊस होत आहे त्यामुळे भात शेतीबरोबरच इतर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कृषी विभागाने नुकसानीचा सर्व्हे करून सविस्तर अहवाल पुढील सभेत ठेवावा अशी सूचना सदस्य सुधीर नकाशे व रणजित देसाई यांनी केले

तर पळता भुई थोडी होईल

शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य अमर सावंत यांना सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी वेळोवेळी घेरण्याचा प्रयत्न केला त्यावेळी सगळे विरुद्ध अमर सेन असे चित्र पाहावयास मिळाले जिल्हा रुग्णालयाच्या एका विषयावर गटनेते रणजित देसाई यांनी नाराजी व्यक्त केली जिल्हा रुग्णालयात सुविधा नाहीत जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा इंटरनेटवर आहे कित्येक दिवस चादरी बदलले जात नाही स्वच्छता नाही यापेक्षाही भयाण परिस्थिती आहे सगळेच बोलायला गेलो तर तुमची पळता भुई थोडी होईल अशा शब्दात सदस्य सावंत यांना इशारा दिला

स्वयंचलित केंद्र वादांकीत

फळपीक विमा कंपनीने यंदा आंब्यासाठी ५४ कोटी रुपये मंजूर केले आहेत एक हेक्टरी २४ हजार प्रमाणे हे पैसे बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जात आहेत गतवर्षी ५२ हजार रुपये मिळाले होते मग या वर्षी एवढे कमी का असा सवाल सदस्य गणेश राणे यांनी उपस्थित करत विमा कंपनी वर संशय व्यक्त केला शासन ५० टक्के व लाभार्थी ५० टक्के हिस्सा असून देखील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत असा आरोप देखील सदस्यांनी केल्या तसेच बसविण्यात आलेली स्वयंचलित केंद्रे वादांकीत असल्याचेही काही सदस्यांनी सांगितले.

कृषी बजेटला कात्री नको

सदस्य महेंद्र चव्हाण यांनी काही झाले तरी कृषी बजेटला कात्री नको असे ठणकावून सांगितले एकतर कोरोना मुळे शासनाने सर्व विभागांचा त्यात ३० टक्के निधी कपात केला आहे त्यात आणखीन कृषी बजेटला कात्री लागल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कृषी बजेट हे समाधान कारक असावे असे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × three =