You are currently viewing ।।संकल्पित इश्वटी मंदिर,डेगवे ।। जाहिर आवाहन

।।संकल्पित इश्वटी मंदिर,डेगवे ।। जाहिर आवाहन

सावंतवाडी तालुक्यातील डेगवे – आंबेखणवाडी-डिंगणे गावच्या संयुक्त सिमेवर “श्री इश्वटी देवाचे स्थान “आहे.त्या ठिकाणी प्रतिवर्षी वार्षिक “पराब” हा कार्यक्रम डेगवे गावकरी मंडळी/गाव रहाटी मोठ्या भक्ती भावाने करतात.


सदर कार्यक्रम जुलै महिन्यात असल्याने पाऊस भरपूर असतो.त्यामुळे पाऊसा मध्ये निवारा असावा म्हणून त्या ठिकाणी” पत्राशेड “उभारुन मंदिर बांधण्याचा संकल्प गावकरी मंडळीने घेतला आहे.त्या करीता रुपये दिड ते दोन लाख खर्च अपेक्षित आहे. गावातील प्रत्येक बिर्हाडामधून वर्गणी धरली आहे.प्रत्येक वाडीतून निधी संकलन होत आहे. सदर काम सुरू असून दगडी पाया व खांब बांधून पूर्ण झाले आहेत.आता छप्पर करणे बाकी आहे.तेही काम अल्पावधीत सुरु करणार आहेत.तरी डेगवे ग्रामस्थ बांधवांनी ,हितचिंतक भाविकांनीआपली वर्गणी/देणगी 9869720936 या नंबरवर गुगलपेने देऊन सहकार्य करावे अशी देवस्थान समितीने नम्र विनंती केली आहे.

*कार्यकारी मंडळ*,

प्रतिक्रिया व्यक्त करा