You are currently viewing होई मन मोकळे

होई मन मोकळे

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरविंदजी ढवळीकर यांची काव्यरचना

 

मनास माझ्या अर्थ वेगळा विश्वाचा या कळे
आज हे मन होई मोकळे

आजवरीच्या हृद्य स्मृतींच्या
कधी सुखाच्या कधी दुःखाच्या
नकळत या जीवाला जडल्या
कधी लाभल्या ईशकृपेच्या
अर्पून त्या अक्षता क्षणांच्या अनुभवतें सोहळे
आज हे मन होई मोकळे ..

कधी दृश्यातच मनही रंगले
कधी अकल्पित स्वप्नं भंगले
सौख्याच्या शोधात निरंतर
मी माझेपण हरवून बसले
शांत चित्त तरी कसे रहावे अंतरी व्यथा छळे
आज हे मन होई मोकळे ……..

प्रसन्नतेचे आयुध घेतले
काय हवे तें मला गवसले
आंनदाचे पसायदानच
आपुलकीच्या ओठी स्मरले
प्रेम ही पूजा नाम निरांजन गुरुदर्शन सोवळे
आज हे मन होई मोकळे ……

अरविंद

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 12 =