You are currently viewing सावंतवाडी भंडारी पतसंस्थेचे चेअरमन लक्ष्मण उर्फ भाई बापू धुरी यांचे अल्पशा आजाराने निधन…

सावंतवाडी भंडारी पतसंस्थेचे चेअरमन लक्ष्मण उर्फ भाई बापू धुरी यांचे अल्पशा आजाराने निधन…

 

सावंतवाडी भंडारी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन आणि भंडारी समाजाचे आधारस्तंभ लक्ष्मण उर्फ भाई बापू धुरी यांचे आज अल्पशा आजाराने ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. हसतमुख असलेले असे हे व्यक्तिमत्त्व भंडारी समाजात विशेष प्रिय होतं.
भाई धुरी भंडारी मंडळ सावंतवाडीचे सल्लागार म्हणूनही कार्यरत होते. भंडारी समाजाच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. भंडारी समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात ते नेहमीच सक्रिय असायचे. भंडारी पटसंस्थेला उर्जितावस्था आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. सावंतवाडी तालुका जेष्ठ नागरिक संघाचे ते पदाधिकारी होते.
भाईंच्या निधनामुळे मळगाव आणि सावंतवाडीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − four =