You are currently viewing फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या संचालकांची स्वप्नपूर्ती

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या संचालकांची स्वप्नपूर्ती

शाळेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण

स्वप्न केवळ पहायची नसतात तर ती पूर्ण करण्याचा ध्यास असायला हवा….स्वप्नपूर्तीचा प्रयत्न करायचा असतो. ज्या शाळेत आपण शिकलो, ज्या शाळेने आपल्याला घडवले ती शाळा सुसज्ज, आधुनिक व्हावी…सर्व सुखसोयी, सुविधा युक्त असावी असे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असते. असेच स्वप्न उराशी बाळगून गेल्या ५/६ वर्षांपूर्वी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीची निवडणूक पार पाडली आणि निवडून आलेल्या संचालकांनी आपल्या शाळेची सुसज्ज इमारत व्हावी…हे एकच स्वप्न उराशी बाळगत स्वप्नपूर्तीचा प्रयत्न केला आणि आज शाळेची सुसज्ज इमारत उभी राहिली.

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या शाळेच्या पहिल्या टप्प्यातील इमारतीचे लोकार्पण सोहळा सत्यात उतरला… सर्व संचालक मंडळाने अथक प्रयत्नांनी शाळेची नवी इमारत उभी केली त्यामुळे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि सर्व सुखसोयी शाळेत मिळण्याचे मार्ग मोकळे झाले. शाळेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आमदार नितेश राणे यांनी वरच्या मजल्याच्या ५ वर्ग खोल्या राणे कुटुंबियांकडून बांधून देण्याचे जाहीर केले तर उद्घाटक उद्योजक श्री.माजगावकर यांनी सर्व शाळा डिजिटल करून देण्याचे घोषित केले तसेच श्री.नाना (विजू) पटेल यांनी १ वर्गखोली बांधून देण्याचे आश्वासन दिले.
शाळेच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या लोकार्पण सोहळ्यास माजी सरपंच दादा पारकर, माजी चेअरमन बबन पवार, व्यापारी संतोष पावसकर, संतोष टक्के, अजित नाडकर्णी, संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि ज्येष्ठ, शाळेचे माजी विद्यार्थी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा