You are currently viewing मिठबाव येथील दुचाकी अपघातात 22 वर्षीय युवक जागीच ठार तर एक जखमी

मिठबाव येथील दुचाकी अपघातात 22 वर्षीय युवक जागीच ठार तर एक जखमी

देवगड

बोलेरो पिकअपची धडक बसल्याने मिठबाव येथे झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार झाला आहे. तर त्याच्या समवेत मागे बसलेला सहकारी गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात काल रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास मिठबाव येथील पशुवैदयकीय दवाखान्यासमोर घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, वेदांत सुनिल राणे वय २३ रा खालचीवाडी मिठबाव असे त्याचे नाव आहे. तर अक्षय अरुण आर्लेकर वय २५ हा जखमी झाला आहे. त्याला अधिक उपचारासाठी कणकवली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी बोलेरो चालक महेंद्र परब याच्यावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत तपासिक अमंलदार तथा पोलिस उपनिरिक्षक दशरथ चव्हाण यांनी दिलेली माहीती अशी की,यातील मयत वेदांत हा आपल्या मित्रासमवेत रात्री घरी परतत होता. यावेळी समोरुन येणार्‍या बोलेरोची मागची बाजू त्याच्या दुचाकीला घासली. व ते दोघे रस्त्यावर कोसळले यात गंभीर दुखापत झाल्यामुळे वेदांत हा जागीच ठार झाला. तर सहकार्‍याला दुखापत झाली आहे. याबाबतची माहीती मिळताच पोलिसांनी त्या ठीकाणी धाव घेतली.यावेळी पोलिस निरिक्षक दिपक बगळे यांच्यासह पोलिस उपनिरिक्षक जितेंद्र कांबळे,हवालदार प्रशांत चव्हाण,भाउ नाटेकर आदींनी त्या ठीकाणी धाव घेवून सहकार्य केेले. याबाबतचा अधिक तपास श्री चव्हाण करीत आहेत.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा