You are currently viewing १०० इडियट्स ग्रुपचे दातृत्व 

१०० इडियट्स ग्रुपचे दातृत्व 

दुर्धर आजाराने त्रस्त गरजू रुग्णांना मदतीचा हात

मालवण :

१०० इडियट्स ग्रुपने पुन्हा एकदा सामाजिक दातृत्व दाखवून दिले आहे. ग्रुपचे दिवंगत सदस्य कै. मयुरेश अरुण मालंडकर उर्फ मयूर याच्या स्मरणार्थ गरीब व दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या मुलांना १०० इडियट्स ग्रुपच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली. भरड दत्त मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमामध्ये कु. अक्षय फाटक रा. वराड , कु. अनिरुद्ध भिलवडकर रा. भरड मालवण आणि कु. भावना नागुलकर रा. देवली यांना वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत सुपूर्द करण्यात आली.

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, जय गणेश स्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. मेघना जोशी, रुग्णवाहिका चालक अवधूत परूळेकर, महेश वस्त व श्री दत्त मंदिर भरड मालवण मंडळ यांच्या हस्ते मदत निधी वितरित करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा