You are currently viewing भावगीत

भावगीत

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारित ज्येष्ठ लेखक कवी प्रो डॉ जी आर उर्फ प्रवीण जोशी यांची भावगीत रचना

अनादी अनंत किती युगाचे
चल सखे गाऊ गीत प्रेमाचे ।। धृ ।।

श्रुष्टीने दिला हा बगीचा
ऋतु बंध आला हा फुलायचा
प्रेमीकाना बहाणा झुलायचा
तुझे माझे गीत एका सुरांचे
।। 1।।

तु नभी अंगणी चंद्रकोर
मी शुक्रतारा भाव विभोर
चांदण्यात हसला तो चकोर
असेच आपण जगायचे ।। 2 ।।

विविध ऋतुने नटले नक्षी
झाडावर गीत गातो पक्षी
सजीव चैतन्य असेल साक्षी
असेच आपण खेळायचे ।। 3।।

तुझ्याच ओठी माझे प्रेमगीत
परंपरेची आहे ही चालरीत
सगळीच गोष्ट उघड गुपित
विरहाने जरासे झुरायचे ।। 4 ।।

प्रो डॉ जी आर प्रवीण जोशी

अंकली बेळगाव
कॉपी राईट

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 2 =