You are currently viewing चला सुखाच्याच गावा ….

चला सुखाच्याच गावा ….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखिका, कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांची काव्यरचना*

चला सुखाच्याच गावा, देऊ दु:ख्खाला विसावा
राग लोभ हा नसावा … चला सुखाच्याच गावा ….

सारी टाकून किल्मिषे,जाळूनच सारी विषे
मनी नको अभिमान,याचे ठेवू या हो भान…
चला सुखाच्याच गावा …देऊ ….

आपपर भाव त्यागू ,मारू प्रेमाने ती मिठी
साक्षात तो जगजेठी ,दृष्टी पाहिलं हो भेटी…
चला सुखाच्याच गावा ..देऊ…..

कोणी नाही सान थोर, सर्वाठाई विश्वंभर
सर्व सुखाचे आगर,फक्त एक परमेश्वर
चला सुखाच्याच गावा..देऊ ….

सर्वाठाई ते चैतन्य,नाही दुसरे हो अन्य
सर्व भूते ती समान,अरे मानवा तू जाण ….
चला सुखाच्याच गावा ..देऊ …

मनी ठेऊ समाधान, करू चला गुणगान
ध्यानी मनी ठेऊ देव,सर्व सुखाचे ते गाव….
चला सुखाच्याच गावा…देऊ …

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + 6 =