You are currently viewing वैधव्य

वैधव्य

*ज्येष्ठ साहित्यिका समाजसेविका पर्यावरणप्रेमी आदर्श शिक्षिका अनुपमा जाधव लिखित भावस्पर्शी काव्यरचना*

 

*वैधव्य*

 

 

पती गेला सोडून तिला

तिचा दोष काय?

तीही कुणाची बहिण आहे

तीही कुणाची माय!

 

 

एक नातं सरलं म्हणून

सगळं संपत नाही

जीवन आहे नदीसारखं

सतत वाहत राही

 

 

 

तिलाही मन आहे

तिलाही भावना

विधवा म्हणून कशाला

द्याव्यात तिला वेदना

 

 

जगण्याची जिद्द तिची

तिला बळ द्या

जगताना तिलाही

सोबत आपल्या घ्या

 

 

 

अनुपमा जाधव

प्रतिक्रिया व्यक्त करा