You are currently viewing वैभववाडीत नागरिकांच्या समस्यांची सभापती सिद्धेश रावराणेंकडून तात्काळ दखल

वैभववाडीत नागरिकांच्या समस्यांची सभापती सिद्धेश रावराणेंकडून तात्काळ दखल

रस्त्यालगतची झाडे-झुडपे, खड्डे आणि एस.टी. स्टँड परिसरातील समस्यांवर प्रशासनाला कार्यवाहीच्या सूचना

वैभववाडी : दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी अर्जदार श्री. डी. के. सुतार यांनी मांडलेल्या विविध समस्यांची पंचायत समिती सभापती श्री. सिद्धेश दिलीप रावराणे यांनी तात्काळ दखल घेतली. रस्त्यालगत वाढलेली झाडे-झुडपे, रस्त्यांवरील खड्डे तसेच एस.टी. स्टँड परिसरातील विविध समस्यांबाबत त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली.

नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी सभापती श्री. सिद्धेश रावराणे यांनी संबंधित प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही केली. जनतेच्या प्रश्नांबाबत तत्परता व संवेदनशीलता दाखवत त्यांनी उपोषणाला सकारात्मक प्रतिसाद दिला.

यावेळी पंचायत समिती उपसभापती सौ. साची कोलते, गटविकास अधिकारी श्री. वाघ साहेब, पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे, सुवर्ण संसारे तसेच पंचायत समितीचे सर्व अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा