You are currently viewing मळेवाड-कोंडूरे गावांसाठी कायमस्वरूपी स्वतंत्र तलाठी मिळावा..

मळेवाड-कोंडूरे गावांसाठी कायमस्वरूपी स्वतंत्र तलाठी मिळावा..

शिवसेना शाखेच्यावतीने तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी..

सावंतवाडी

मळेवाड-कोंडूरे गावांसाठी कायमस्वरूपी स्वतंत्र तलाठी मिळावा, या मागणीचे निवेदन मळेवाड-कोंडूरे शिवसेना शाखेच्यावतीने ज़िल्हा परिषद सदस्य राजन मुळीक यांनी आज, बुधवारी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मळेवाड-कोंडूरे या गावांसाठी एकच तलाठी आहे. मात्र, येथील तलाठी गिरप यांची अन्यत्र बदली झाल्याने श्री. पास्ते यांच्याकडे येथील अतिरिक्त कार्यभार दिला आहे. पास्ते यांच्याकडे अन्य सजाचा कार्यभार असल्याने येथील कामकाजासाठी आठवड्यातील ठराविक दिवस दिले आहेत. या दिवशीही पास्ते यांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागल्यास त्या दिवशीही ते उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे मळेवाड-कोंडूरे गावातील शेतकरी, ग्रामस्थ यांची विविध दाखले मिळविण्यासाठी गैरसोय होते. सध्या भात खरेदीचा हंगाम असल्याने सात-बारा तसेच अन्य दस्तऐवजांची शेतकऱ्यांना नितांत आवश्यकता आहे. परंतु तलाठी मिळत नसल्याने त्यांना वारंवार खेपा माराव्या लागत आहेत. यात वेळ आणि पैसा या दोन्हीचा अपव्यय होत आहे. त्यामुळे मळेवाड-कोंडूरे गावासाठी कायमस्वरूपी स्वतंत्र तलाठी मिळावा, अशी मागणी राजन मुळीक यांनी केली आहे.

यावेळी बाळ शिरसाट, शाखाप्रमुख मुन्ना मुळीक, प्रकाश पार्सेकर, श्रीकांत नाईक, मनीष नाईक आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा