You are currently viewing “हॉटेल रॉयल विजयदुर्ग” चे उद्या होणार ग्रँड ओपनिंग

“हॉटेल रॉयल विजयदुर्ग” चे उद्या होणार ग्रँड ओपनिंग

पडेल, ता.देवगड येथील हॉटेल रॉयल विजयदुर्ग ग्राहकांच्या सेवेत होणार दाखल

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाल्यानंतर जिल्ह्यात देशी विदेशी पर्यटकांचा ओघ वाढलेला पहावयास मिळाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद किनारे हे गोव्यापेक्षाही उच्च दर्जाचे आणि शांत, मनमोहक असल्याने अनेक पर्यटकांच्या पसंतीचे ठरत आहेत. परंतु देवगड, विजयदुर्ग सारख्या समुद्र किनारी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले इतिहासाचे साक्षीदार असलेले किल्ले, जलदुर्ग आहेत, त्यातील एक अद्भुत किल्ला म्हणजे “विजयदुर्ग”…. परंतु येणाऱ्या पर्यटकांना होणारी राहण्याची आणि खाण्याची गैरसोय पाहता पर्यटकांचा ओघ कमी होऊ लागतो. पर्यटकांची होणारी गैरसोय आणि पडेल सारख्या जिल्ह्याच्या एका टोकाला असलेल्या भागात उच्च दर्जाचे हॉटेल असावे असे स्वप्न पाहत मुफीद बगदादी यांनी पडेल येथे “हॉटेल रॉयल विजयदुर्ग” उभारले आहे.
दिनांक 15 डिसेंबर 2021 रोजी “हॉटेल रॉयल विजयदुर्ग” चे मोठ्या दिमाखात “ग्रँड ओपनिंग” होत असून ते ग्राहकांच्या सेवेत रुजू होत आहे. हॉटेल रॉयल विजयदुर्गची खासीयत म्हणजे तिथे मिळणारे मालवणी व्हेज/नॉन व्हेज तसेच चायनिस, पंजाबी आणि तंदुरी डिशेस…..यातच “सोने पे सुहागा” म्हणजे पर्यटकांना राहण्यासाठी एसी/नॉन एसी रूम्स आणि मिटिंग, पार्टीसाठी काँफरन्स हॉल…
मुफीद बगदादी यांचे हॉटेल रॉयल विजयदुर्ग पुन्हा एकदा नव्या जोशात….नव्या अवतारात ग्राहकांच्या सेवेत रुजू होत आहे….आपण सर्वांनी या दिमाखदार सोहळ्यात सहभागी व्हावे सेवेचा अवसर द्यावा असे आवाहन बगदादी यांजकडून करण्यात आले आहे…
ग्राहक सेवा हीच ईश्वर सेवा

ग्रँड ओपनिंग
दिनांक: 15 डिसेंबर 2021

वेळ
सायंकाळी ठीक 5.00 वाजता

प्रतिक्रिया व्यक्त करा