You are currently viewing माजी जि. प. सदस्य आनंदी परब कुटुंबासमवेत शिवसेनेत…

माजी जि. प. सदस्य आनंदी परब कुटुंबासमवेत शिवसेनेत…

सावंतवाडी :

कट्टर राणे समर्थक असलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्य आनंदी परब यांनी आज आपल्या कुटुंबासमवेत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांचे सुपुत्र विद्याधर परब यांना शेती संस्था गटातून जिल्हा बँकेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. याबाबतची अधिकृत घोषणा आमदार दीपक केसरकर यांनी केली. ही जागा यापूर्वी स्वर्गीय प्रकाश परब यांच्या ताब्यात होती. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून त्यांच्या गावातील परब यांना संधी देण्यात आल्याचे केसरकर यांनी सांगितले.

विद्याधर यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे खरं कुटुंबीय नाराज होते. त्यामुळे त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. तत्पूर्वी त्यांना शिवबंधन बांधले. यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, अशोक दळवी, एकनाथ नारोजी, नारायण राणे, नगरसेविका अनारोजीन लोबो, प्रकाश परब आदी उपस्थित होते. तर रवींद्रनाथ परक जालिंदर परम महेश परब अभिजित पराब जयराम परब विक्रम परक मनिष पराब आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा