You are currently viewing मार्गदीप बाबा

मार्गदीप बाबा

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी राजमन उर्फ राजेश नागुलवार यांची अप्रतिम रचना

विषय : चैतन्याचे चांदणे

शीर्षक : मार्गदीप बाबा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
चैतन्याचे चांदणे, तू शिंपिले भीमराय ।
गरीब दलितांचा तूच होउनी बाप-माय ॥धृ॥

नव्हता कोणी वाली अनाथांचा देवा
संविधानाने केली, दीनदुबळ्यांची सेवा
अस्तित्वाच्या लढ्याला, दिला खरा न्याय ॥१॥

जात-पात, धर्म कधी, नव्हते अपुले कर्म
घटनेच्या साक्षीने रचियले भाव मर्म
भेदभावावर केला शिल्पकारा तू उपाय ॥२॥

भौगोलिक विविधता नि भाषेत वेगळेपण
कायदेपंडिताने जपले केवळ माणूसपण
त्रिसूत्री राज्यघटना, त्यावरी तरणोपाय ॥३॥

कोटी कोटी जनतेचा तू मार्गदीप बाबा
तुझा जन्म इतिहासात साक्षीभूत ताबा
ज्ञानसूर्य प्रकाशाने लिहिला नवा अध्याय ॥४॥

अवकाशात लखलखणारा तू दिव्य तारा
पृथ्वीतलावरी सत्याच्या आरशाचा पारा
शिक्षणात निपुण, बहुजनांचा स्वाध्याय ॥५॥

शब्दसुमने अर्पितो, मुक्तकंठाने तुजला
माणुसकीच्या दाता तू चंदनापरि झिजला
तिमिरातून तेजाकडे नेलासि समुदाय ॥६॥

***************************
*©️®️🖋राजमन*
*(राजेश नागुलवार)*
*चंद्रपूर*
*9175229509*

प्रतिक्रिया व्यक्त करा