You are currently viewing पावसातला रोमान्स..

पावसातला रोमान्स..

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य कवी सचिन मस्कर यांची काव्यरचना

प्रेयसी , मी आणि
पाऊस कोसळणारा
तिच्या देहावरचे थेंब
जणू हृदयाच्या गारा..

ओला सारा देह तिचा
मी मिठीत घेतल्यावर
मिलनरंग उधळतात
या हृदयी इंद्रधनुष्यावर..

भान दोघांना न राहिले
सभोवताली पावसाचे
धडधड हृदयाची जणू
संगीत आमच्या स्पर्शाचे..

मी पाऊस अन् ती धरती
असे नंतर वाटू लागले
ओघळलो देहावर तिच्या
चिंब प्रणयशिल्प कोरले..

©️®️ सचिन मस्कर , नवी मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा