You are currently viewing सावंतवाडीत माजी सैनिकांसह विद्यार्थ्यांचा सत्कार…

सावंतवाडीत माजी सैनिकांसह विद्यार्थ्यांचा सत्कार…

मराठा समाज उत्कर्ष मंडळाचे आयोजन; शहिदांना वाहिली श्रद्धांजली…

सावंतवाडी

तालुक्यातील दहा माजी सैनिकांचा आणि शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा आज येथे वधू वर सुचक मेळाव्यात सत्कार करण्यात आला. यावेळी तामिळनाडू येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सीडीएसचे जनरल बिपिन रावत यांच्यासह अन्य १४ जणांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये सावंतवाडी संस्थांच्या राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष संजू परब,युवराणी श्रद्धादेवी भोसले, माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, यशवंतराव भोसले नॉलेजसिटीचे संस्थापक अच्युत भोसले,अँड. संतोष सावंत,मकरंद तोरसकर, दत्ताराम सडेकर,सुहासिनी सडेकर,विनोद सावंत, दत्ता सावंत,सत्यजित धारणकर, रमेश गावकर,भक्ती सावंत, उज्वला सावंत,पंढरी राऊळ,विजया रामाने आदी उपस्थित होते.

दरम्यान मराठा समाज उत्कर्ष मंडळाच्या वतीने सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हॉल येथे वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थांच्या महाराणी शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी दोन दिवसांपूर्वी हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले तिन्ही दलाचे प्रमुख बिपिन रावत यांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.तर विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि दहावी, बारावी, पदवी अभ्यासक्रमात उत्तुंग यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वधू वर सूचक मेळाव्याला मोठ्या प्रमाणात मुले व मुली उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 2 =