अपघातात गंभीर जखमी झालेल्या सत्यवान नाटळकर यांचे निधन

अपघातात गंभीर जखमी झालेल्या सत्यवान नाटळकर यांचे निधन

कणकवली

मुंबई गोवा महामार्गांवर जानवली येथील पेट्रोल पंपासमोर सोमवारी दुपारी स्विफ्ट कार व मोटारसायकल मध्ये झालेल्या अपघातातील गंभीर जखमी सत्यवान नारायण नाटळकर याना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवीत असताना वाटेतच निधन झाले. सत्यवान नाटळकर यांच्या मोटारसायकल मागून स्विफ्ट कार ने धडक दिल्याने ते जबर जखमी झाले होते.  त्यांचा उजवा पाय जायबंदी झाला होता. येथील खाजगी हॉस्पिटल मधून अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवीत असताना त्यांचे वाटेतच निधन झाले. सत्यवान नाटळकर हे नाटळ येथील साईलीला हॉस्पिटल मध्ये कार्ययत होते. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा