You are currently viewing स्वच्छता कार्यक्रमाने आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा

स्वच्छता कार्यक्रमाने आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा

वैभववाडी

माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट, आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि अरविंद सावंत सरदार माध्यमिक विद्यालय नाधवडे यांच्या संयुक्त विद्यमाने दि‌.११ डिसेंबर या आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाच्या निमित्ताने नाधवडे येथील पर्यटन स्थळ असलेला बारमाही वाहणारा उमाळा येथे स्वच्छता कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला जि. प. सदस्य श्री. सुधीर नकाशे, नाधवडे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी. एस. पाटील, प्रा‌.श्री.एस.एन‌ पाटील, लुपिन फाऊंडेशनचे प्रविण पेडणेकर, माजी विद्यार्थी विशाल सावंत,ओमकार चव्हाण व शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी जि.प. सदस्य श्री. सुधीर नकाशे यांनी सहभागी विद्यार्थ्यांना व्यक्तिगत व सामाजिक जीवनात स्वच्छतेचे महत्व सांगितले. मुख्याध्यापक श्री.डी.एस.पाटील यांनी अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी गावाच्या विकास कामामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पाहिजे असे सांगितले. प्रा.एस. एन. पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाचा इतिहास, पर्वत पूजनाचे महत्त्व व त्यानिमित्ताने स्वच्छता कार्यक्रमाचे केलेले आयोजन याबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांना पर्वत प्रतिज्ञा देण्यात आली. या स्वच्छता कार्यक्रमाला वैभववाडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी.एस. काकडे व प्रा.सौ. वंदना काकडे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
शेवटी प्रविण पेडणेकर यांनी सर्वांचे आभार मांडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा