You are currently viewing पोलीस पाटील पदाकरीता 7 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत

पोलीस पाटील पदाकरीता 7 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत

पोलीस पाटील पदाकरीता 7 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत

सिंधुदुर्गनगरी

 कुडाळ महसूल उपविभागातील तहसिल कुडाळ व मालवण या तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाकरीता  कुडाळ  तालुक्यातील 66, व मालवण तालुक्यातील 89, अशा एकूण 155 पदांकरीता दि. 7 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत होणार आहे.

मंजूर बिंदूनामावलीप्रमाणे प्रचलित शासकीय तरतुदीनुसार संबंधित गावाचे लोकसंख्येनुसार व चिठ्ठीव्दारे आरक्षण निश्चिती करावयाची असून त्याकरीता आरक्षण सोडत काढण्याकरीता दि. 7 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजता तहसिलदार कार्यालय, कुडाळ  येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी संबंधित गावातील इच्छुकांनी उपस्थित राहावे, असे उपविभागीय दंडाधिकारी तथा, पोलीस पाटील पद भरती प्रक्रीया समितीचे अध्यक्ष ऐश्वर्या काळुशे यांनी कळविले केले आहे.

कुडाळ व मालवण तालुक्यातील पोलीस पाटील पद रिक्त असणारे सजा पुढीलप्रमाणे –  मडगांव, कांडरगांव, गोंधळपुर, गुढीपुर, टेबधुरीनगर, देऊळवाडी, पिंगुळी, रुमडगांव, कारीवणे, टेंबगांव, पांग्रड, निरुखे, भरणी, सोनवडे तर्फ कळसुली, घाडीगांव, दुर्गानगर, साईगांव, माणकादेवी, कविलगांव, कुटगांव, बेलनदी, बोरभाट, मिटक्याचीवाडी, नाईकवाडी, तळेगांव, आंदुर्ले, मुणगी, हुमरमळा, गांधीनगर, गोवेरी, गोधयाळे, वालावल, गावधड, मुड्याचा कोंड, हुमरस, जांभरमळा, घाटकरनगर, तळीगांव, बेनगांव, कट्टागांव, ढोलकरगांव, नमसगांव, भट्टगांव, खोचरेवाडी, नमसपुर, खुटवळवाडी, साकीर्डे, कुपवडे, गवळगांव, भुतवड, झाराप, केरवडे तर्फ माणगांव, कांदूळी, बांव, चाफेली, मोरे, नेरूर कर्याद नारूर, गोठोस, कुसबे, साळगांव, बांबुळी, गांधीग्राम, नाईकनगर, सांगिर्डे, कविलकाटे, नेहरूनगर यांचा समावेश आहे.

 मालवण –  आमडोस. कुणकवळे, खोटले, गुरामवाड, गोळवण, चौके, तळगाव, तोंडवली, धामापुर, नांदरुख, पेंडुर, पोईप, बिळवस, महान, मालोंड, वराड, बायंगवडे, सुकळवाड, हडी, आडवली, पळसंब, बांदिवडे खुर्द, भगवंतगड, राठिवडे, शिरवंडे, वायरी, तारकली, कातवड, काळेथर, मळा, वाक, वाघवणे, आनंदव्हाळ, कर्लाचाव्हाळ, माळकेवाडी, परबवाडा, बागवाडी, खरारे, मोगरणे, सोनारवाडी, कूसरवे, चाफेखोल, नागझर, टॅबवाडी, डिकवल, खांद, पेडवे, म्हावळूंगे, गवळीवाडा, भटवाडी, घाडीवाडी, गावठाण, वरचीवाडी, डोंगरेवाडी, अपराजवाडी, कुंभारवाडी, भटवाडी (चिंदर), पालकरवाडी, गावठाणवाडी, सडेवाडी, तेरईवाडी, जामडूल, पिरावाडी, हिर्लेवाडी, कावा, मर्डे, सय्यदजूवा, मार्गाचीतड, | वाडीडांगमोडे, खाजनवाडी, मागवणे, मळावाडी, पालयेवाडी, बगाडवाडी, पलिकडीलवाडी, बागवेवाडी, बेलाचीवाडी, कोळंब, न्हिवे, ओझर, सर्जेकोट, शेमाडराणेवाडी, कोथेवाडा, गावकरवाडा, जूवापाणखोल, आंगणेवाडी, भोगलेवाडी, आमवणे, खेरवंद यांचा समावेश आहे.

______________________________
*संवाद मीडिया*

*पाहिजेत..पाहिजेत.. पाहिजेत…!*

*अकाउंट : TALLY व पदवीधर आवश्यक.*

*सेल्समन : पदवीधर आवश्यक*

*आकर्षक पगार*

**स्थानिकांना प्राधान्य**

*संपर्क*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114207/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा