You are currently viewing रत्नागिरी सिंधदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे (शिंदेगट) संभाव्य उमेदवार श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांची सावंतवाडीत एकमुखी दत्त मंदिर येथे भेट

रत्नागिरी सिंधदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे (शिंदेगट) संभाव्य उमेदवार श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांची सावंतवाडीत एकमुखी दत्त मंदिर येथे भेट

सावंतवाडी :

 

सावंतवाडीतील भंडारी समाजाच्या जिल्हा व तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांनी सावंतवाडीतील प.प.श्रीमत् श्री.टेंबे स्वामी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या एकमुखी दत्त मंदिरात भेट देत श्री दत्तगुरुंचा आशीर्वाद घेतला. यावेळी नूतन मंदिर कमिटीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, व स्वामीभक्त उपस्थित होते.

श्री.एकमुखी दत्तमंदिर येथे श्री.किरण सामंत यांनी श्री एकमुखी दत्त व श्री.टेंबे स्वामी पादुका मंदिरचे दर्शन घेतले. यावेळी मंदिरचे पुजारी श्री.कशाळीकर यांनी “श्री.किरण सामंत यांना शिवसेनेची धनुष्यबाण निशाणीवर लोकसभेची उमेदवारी मिळू दे” असे गाऱ्हाणे घातले. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय आंग्रे, अशोक दळवी, रूपेश पावसकर, खेमराज उर्फ बाबू कुडतरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मंदिर कमिटीचे सदस्य श्री.जगदीश मांजरेकर यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देत शब्दसुमनांनी सर्वांचे स्वागत केले.

या भेटी दरम्यान मंदिर कमिटीचे जितेंद्र पंडित, राजन आंगणे, जगदीश मांजरेकर, दीपक पटेकर, सुधीर धुमे, अशोक नाईक, विलास सावंत, मिरा सिंग, अमेय पई, सत्यनारायण बांदेकर, श्री.पराडकर आदी पदाधिकारी सदस्य आणि स्वामी भक्त उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + 19 =