You are currently viewing दोडामार्ग शिक्षक भारती स्नेह मेळावा गुणगौरव उद्या

दोडामार्ग शिक्षक भारती स्नेह मेळावा गुणगौरव उद्या

कोनाळकट्टा येथे उपस्थित राहण्याचे आवाहन

दोडामार्ग

शिक्षक भारती परिवार, दोडामार्ग च्या तालुक्यातील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत स्नेह मेळावा व गुणगौरव कार्यक्रमरविवारी दि 12 डिसेंबर 2021 रोजी एम आर नाईक विद्यालय कोनाळकट्टा येथे सकाळी 9.30 वाजता संपन्न होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहण्यांचे आवाहन शिक्षक भारती दोडामार्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारच्या वतीने पद्यश्री पुरस्कार प्राप्त श्री परशुराम गंगावणे पोलीस निरीक्षक आर जी नदाप तर अध्यक्ष म्हणून संजय वेतुरेकर अध्यक्ष जिल्हा शिक्षक भारती उपस्थित राहणार आहे तर प्रमुख उपस्थिती शिक्षक भारतीचे सचिव सुरेश चौकेकर कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर राज्य प्रतिनिधी सी डी चव्हाण महिला आघाडी प्रमुख सुस्मिता चव्हाण जिल्हापतपेढी संचालक समीर परब प्राथमिक शिक्षक अध्यक्ष मणिपाल राऊळ आदी मान्यवर मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहे.

तरी तालुक्यातील शिक्षक शिक्षकेत्तर बंधू भगिनी यांनी मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संघटक दत्तात्रय काटकर कार्यध्यक्ष एल डी परब सचिव श्रीनिवास शिंगे अध्यक्ष शरद देसाई सहसचिव बी एम नागरगोजे उपाध्यक्ष प्रेमनाथ गवस योगेश गावित आदींनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − eleven =