You are currently viewing आ. वैभव नाईक यांच्या हस्ते गुरामवाडी पुलाच्या कामाचा शुभारंभ

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते गुरामवाडी पुलाच्या कामाचा शुभारंभ

४० लाख, ६९ हजार रु.निधी मंजूर; ग्रामस्थांनी मानले आभार

मालवण तालुक्यातील गुरामवाडी कुंभारवाडी रस्ता ग्रा.मा. ३०३ वर पूल मंजूर करण्यात आला असून कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते काल श्रीफळ वाढवून या पुलाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. अनेक वर्षे हा पूल मंजूर कारण्याची मागणी होत होती.आमदार वैभव नाईक यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून या पुलासाठी ४० लाख, ६९ हजार, ९३० रु. निधी मंजूर करून आणला आहे. यामुळे गुरामवाडी कुंभारवाडीतील ग्रामस्थांची गैरसोय आता दूर होणार आहे. याबद्दल ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत.

याप्रसंगी जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डांटस, शिवसेना उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, विभाग प्रमुख अण्णा गुराम, पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, विनोद आळवे, बाबू टेंबुलकर, शाखा प्रमुख देवदास रेवडेकर, रवी गुराम, युवासेना उपतालुकाप्रमुख सोमनाथ माळकर, मिलिंद गुराम सुभाष ठोंबरे श्रीकृष्ण गुराम, बापू फाटक, विष्णू लाड, दादा मिठबांवकर,भास्कर पवार,जयसिंग पार्टे, मोहन गोठणकर, श्री. सावंत, निलेश हडकर,श्री. पेडणेकर, संतोष झोरे, किरण रावले, संतोष नागडे, श्री. परुळेकर.महिला आघाडीच्या देवयानी मसुरकर,श्वेता सावंत, दिनेश भोजने, पप्पी सावंत,श्री. ढोलम आदींसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा