You are currently viewing ।। श्री ब्राह्मणी तीर्थक्षेत्र,आंबेखणवाडी।।

।। श्री ब्राह्मणी तीर्थक्षेत्र,आंबेखणवाडी।।

🙏 : जाहिर आवाहन :🙏
बंधुहो,
आमच्या डेगवे गावातील आंबेखणवाडीत सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक विकासाचे कार्य ग्रामस्थ करीत असतानाही वाडीतील देवस्थानांकडे प्रथमपासून लक्ष देत आहे.आजच्या लोकशाही युगातही देवस्थाने हि गावाची श्रद्धास्थाने आहेत.त्याचें जतन केले पाहिजे आशी ग्रामस्थांची धारणा आहे.देव देवस्थाना बाबत प्रसिद्ध असणाऱ्या कोकणातील आमच्या डेगवे गावात ग्राममंदिरे आहेत.त्याचप्रमाणे गावातील प्रत्येक वाडीत “ब्राह्मणीस्थळे” आहेत.त्यामुळे सदर ठिकाणी गावातील प्रत्येक वाडीतील ग्रामस्थ आपापल्या ब्राह्मणीस्थळात प्रतिवर्षी ब्राह्मण भोजन व श्री सत्यनारायणाची महापुजा इत्यादी कार्यक्रम मोठ्या भक्तीभावाने साजरे करतात.

अशाच प्रकारे डेगवे- आंबेखणवाडीत “ब्राह्मणी स्थळ” आहे. त्यामुळे सदर ठिकाणी प्रतिवर्षी “ब्राह्मण भोजन” “,श्री सत्यनारायणाची महापुजा, गौरी पुजन-विसर्जन, वटपौर्णिमा, श्रावण महिन्यात “सात सोमवारचे व्रत” करणे,त्या नंतर ७ व्या सोमवारी देवतांवर “अभिषेक”करणे.भजन,करणे व विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तीभावाने साजरे केले जातात.
म्हणून सदर ठिकाणी सार्वजनिक तुळशीवृंदावन डिसेंबर १९८७ मध्ये बांधले आहे.त्या नंतर तेथील परीसराचे टप्याटप्याने जिर्णोध्दाराचे काम केले आहे. आंबेखणवाडीच्या मध्यवर्ती ,व आंबेखणवाडीची छान असलेल्या या ठिकाणी “श्री ब्राह्मणी तीर्थक्षेत्र” व्हावे अशी नियतीची इच्छा आहे.
त्यामुळे जानेवारी २०२१ मध्ये सदर परीसराच्या जिर्णोध्दाराचे काम हाती घेतले. आणि बघता,बघता सर्व ग्रामस्थ बांधवांनी, नोकरी-व्यवसाय करणाऱ्यांनी, माहेरवाशिणीनी, हितचिंतक भाविकानी भरघोस देणगी देऊन मोठा हातभार लावला.त्यामुळे जिर्णोध्दाराचा हा मोठा पल्ला गाठू शकलो.
आता त्या परीसराचे रंगकाम करणे महत्वाचे आहे.या कामात नेहमी प्रमाणे आर्थिक सहकार्य कराल असा आम्हाला दृढ विश्वास आहे. देणगी दात्याची योग्य ती नोंद घेतली जाईल.तरी सर्वानी सहकार्य द्यावे हि पुनश्च नम्र विनंती आहे.
आपण आयुष्यात आपल्या परीने कुंटुबासाठी तळमळीने कष्ट करतो व थोडे फार कमवतो.त्यातील मार्गशीर्ष महिन्यात थोडी फार देणगी जिर्णोध्दारास देऊन जिर्णोध्दाराचे काम पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्यास देवीची मनोभावे सेवा केल्याचा आपला आनंद द्दिगुणीत होईल..
श्री ब्राह्मणीस्थळाचा रुपाने “आंबेखणवाडीची किर्ती” सर्वदुर पसरेल.शिवाय ब्राह्मणीस्थळाच्या रुपाने “आंबेखणवाडी च्या” गौरवशाली वैभवात नव्याने भर पडेल असा आम्हाला दृढ विश्वास वाटतो आहे.त्यामुळे आपण आपले योगदान देऊन तसेच आपल्या परीचितांना सांगून देणगी देण्यासाठी प्रवृत्त कृपया करावे.हि विनंती आहे.
आपली अमोल देणगी 9869720936 या क्रमांकावर गुगल पे / फोन पे करावी.देणगी मिळताच त्वरित पोच पावती दिली जाईल.
धन्यवाद!!
*।।सहकार्याचा देऊनी हात;।।*
*।।ब्राह्मणीस्थळाला करा साथ।।*

——कार्यकारी मंडळ—-
श्री ब्राह्मणी तीर्थक्षेत्र,आंबेखणवाडी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + nineteen =