You are currently viewing जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविणार ; अध्यक्ष मनीष दळवी

जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविणार ; अध्यक्ष मनीष दळवी

पोईप भाजपच्या वतीने सत्काराचे आयोजन

मालवण

मालवण तालुक्यातील पोईप वेताळ मंदिर येथे भाजप कार्यकरणीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा बॅकचे अध्यक्ष मनिष दळवी, संचालक संदीप (बाबा) परब यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर माजी सभापती राजू देसाई, नाना पालव, परशुराम(नाना)नाईक,
शंकर पालव, पोईप गावचे माजी पोलीस पाटील दत्ताराम आप्पा पालव, गोपिनाथ पालव, सत्यवान नाईक, सावळाराम नाईक, नंदू माधव, सुर्यकांत चव्हाण, विश्वनाथ पालव, रविंद्र पालव, श्रीधर नाईक, गोविंद पोईपकर, स्वप्निल पोईपकर उपस्थित होते.
मनिष दळवी म्हणाले, शेतकऱ्यांना वसुली बाबत बॅंक अधिकाऱ्यांचा त्रास होणार नाही. जिल्हामध्ये विविध सोसायटी मध्ये जाउन शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे. रोजगारा साठी लागणारी कर्ज त्वरित देण्यात येईल असेही त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. जिल्हा बॅंकेचे संचालक. संदीप (बाबा)परब म्हणाले, शेतकऱ्यांना तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याचे अधिकार सोसायटीच्या अध्यक्षाना देण्याचा विचार आहे. बॅंक किंवा सोसायटीची जी काय कर्ज प्रकरणे असतील त्यांना मान्यता देण्यासाठी वेळ लागत असेल तर अधिकाऱ्यांनाच घेऊन सोसायटीमध्ये प्रकरणे मंजूर करण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच जिल्हा बॅंकेच्या कुठल्याही शाखेत शेतकरी खातेदारास अडचणी निर्माण झाल्यास तात्काळ संपर्क साधण्याचा आवाहन बाबा परब यांनी केले.
यावेळी भाजप कार्यकारिणी संघटनेचे पदाधिकारी शंकर (बाळा) पालव, महेश पालव, हेमंत पालव,पोईप ग्रा. पं. उपसरपंच संदीप सावंत, मंगेश नाईक, बाबाजी नाईक, जयवंत परब, नितीन माधव, स्वप्नील पोईपकर, शामा पोईपकर उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप सावंत, आभार महेश पालव यानी मानले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा