You are currently viewing तू अन् मी

तू अन् मी

वीरांगना सावित्रीबाई फुले राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार २०२१ प्राप्त आदर्श शिक्षिका श्रीमती रतन कराड यांची अप्रतिम काव्यरचना

तू सृष्टीचा निर्माता नियंता – मी सर्व भाव अर्पिता
तू अव्यक्त निर्गुण निराकार – मी सदैव सगुण साकार
तू जळीं, स्थळीं, काष्टी, पाषाणी कुठेही – मी अडकलो या देहीं
तू असशी वैकुंठीचा राणा – मी माणूसच, हाच माझा बाणा
तू ना भिजतो, ना जळतो, ना उडतो – मी मात्र हे सर्व भोगतो
तू अंतर्यामी सर्व पाहतो – मी मात्र एकटा राहतो
तू सदा कैवल्यानंदात – मी रमतो लौकिकानंदात
तू तर सर्व परब्रम्ह एकले – मला न कळे त्यातले
लोक म्हणती अहं ब्रह्माम्सि तत्त्वमसी – मी तर सदा आभासी
बा रे लाविले जगा वेडं – ही काय किमया काय कोडं
कधी न कळला हा तिढा – जन्मापासुनि लागली ही पीडा
मानतो मी देवकण अन् शक्ती – मन नाही मानत तुझी नाम शक्ती,
कशी जडावी संगत तुझी माझी – तरी ही मन जडते तुझ्याशी
असशी जर खरा देव परी – प्रकटला असतास एकदा तरी
आता तरी दाखव रूप तुझे – कर शंका समाधान माझे

कवियित्री
श्रीमती. कराड रतन अंबादास (सहशिक्षिका) जि. प. हा हदगाव
ता. हदगाव.जि.नांदेड
मो.नं. 8855885779

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + twenty =