You are currently viewing इच्छा

इच्छा

गझल मंथन, गझल प्राविण्य आदी समूहांच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका, गझलाकार सौ शोभा वागळे यांची भक्तिमय अभंग रचना

इच्छा तेथे मार्ग । म्हण जुनी फार
शक्ती ती अपार । इच्छुकांंची ।। १ ।।

निर्धार मनाचा । दृढ संकल्पना
कठोर कामना । यश प्राप्ती ।। २ ।।

ज्ञान मिळवण्या । ग्रंथाचे वाचन ।
सखोल चिंतन । आचरण ।।३ ।।

सफलता कार्या । इच्छा बळावर ।
कष्ट निरंतर । इच्छापुर्ती ।। ४ ।।

निर्धार तो पक्का । कार्य सतर्कता
ती परिपूर्णता । एकमेव ।।५ ।।

इतिहास साक्षी । इच्छेचे महत्त्व ।
एकच ते तत्त्व । इच्छा मार्ग ।।६ ।।

स्वप्नपुर्तीसाठी । इच्छा मनी धरा ।
काम तसे करा । यशासाठी ।। ७ ।।

शोभा वागळे
मुंबई
8850466717

प्रतिक्रिया व्यक्त करा