You are currently viewing माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीसाठी 15 जानेवारी 2021 पर्यंत मुदतवाढ…

माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीसाठी 15 जानेवारी 2021 पर्यंत मुदतवाढ…

सिंधुदुर्गनगरी  

माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांसाठी सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात 10 वी व  12 वी या इयत्तेत 60 टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त झालेल्या पाल्यांना गुणवत्तेनुसार शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी दि. 15 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज मागविण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. तथापि कोविड-19 मुळे शाळा, कॉलेज बंद असल्याकारणामुळे पाल्यांना गुणपत्रक, बोनाफाईड आदी कागदपत्रे मिळणे शक्य होत नसल्याने, शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याच्या तारीखेला दि. 15 जानेवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 1 =