You are currently viewing फोंडाघाटात फरशी भरलेला ट्रक कोसळला…

फोंडाघाटात फरशी भरलेला ट्रक कोसळला…

कणकवली

फोंडाघाटातील खिंडीपासुन पहिल्याच वळणावर ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने कोल्हापूरकडून फोंड्याच्या दिशेने फरशी भरून येणारा २० चाकी ट्रक वरील रस्त्यावरून खालच्या रस्त्यावर एका बाजूला कोसळला. यात ट्रकचे मोठे नुकसान झाले. चालकाला किरकोळ दुखापत झाली.

रविवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान हा अपघात घडला. मोठा आवाज ऐकून लगतच्या घोलप हाॅटेल मधील, पवन भालेकर आणि अन्य स्थानिक लोकांनी ड्रायव्हर अल्ताफ गुलाल तांबोळी (वय 34 वर्ष, राहणार पेरले- कराड) यांना बाहेर काढून पाणी आणि जेवण दिले. वाहतूक सुरळीत केली. सकाळी महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतुकीतील झालेला अडथळा दूर केला. सध्या अवजड वाहनांची वाहतूक यामार्गे वाढल्याने व त्यावर कोणाचाही निर्बंध नसल्याने वारंवार अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा