महिला आर्थिक विकास महामंडळ, सिंधुदुर्ग स्थापित सिंधुकन्या लोकसंचलित साधन केंद्र, कट्टा मालवण नगर परिषद मालवण दिनदयाळ अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत स्थापित जय भवानी वस्ती स्तर संघ, देवूळवाडा मालवण व SSPM लाईपटाइम हॉस्पिटल पडवे यांचे मार्फत दि.04 डिसेंबर 2021 रोजी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित घेण्यात आले. यावेळी महिलांची डोळे तपासणी, सांधे दुखी, गुडघे दुखी, रक्तदाब तपासणी तसेच महिलांच्या आजारांबाबत माहिती दिली. यावेळी मा. श्रीम.आशालता जमणे (लेखाधिकारी माविम सिंधुदुर्ग), मा.श्रीम.डॉ. कविता मांजरेकर डॉक्टर, मा.श्रीम.नीना मुंबरकर (जय भवानी ALF देऊळवाडा अध्यक्ष), मा.श्रीम. संजना मांजरेकर (संकल्प CLF मालवण अध्यक्ष ), मा.श्रीम. गिता चौकेकर* (व्यवस्थापक सिंधुकन्या CMRC कट्टा मालवण), मा.श्रीम. दामीनी माने (सिंधुकन्याCMRC लेखापाल) श्री.खेमराज सावंत (क्षेत्रिय समन्वयक मालवण), मा. श्री.मिनर्वास परब(नेत्र चिकित्सक), मा. श्री.विकास लुडबे*(P.R.O), *मा. श्री.लक्ष्मण देसाई (गोलबल फाउंडेशन व्यवस्थापक), मा. श्री.हरिश्चंद्र परब (P.R.O.), श्रीम. अनघा वाघाटे, मा. श्री.कैलास यादव, मा. श्री.उमेश गावडे, मा.श्रीम.मनीषा गावकर (संकल्प CLF प्रतिनिधी ) ,सौ.सायली कांबळी (सहयोगिनी) आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच जय भवानी ALF कार्यकारिणी व सदस्य उपस्थित होते.
मा. श्री.हरिश्चंद्र परब (P.R.O.), यांनी महिलांना मार्गदर्शन करताना महिलांचे आरोग्य तपासणी करणे का गरजेचे आहे आणि आरोग्य कसे जपले पाहिजे या बाबत माहिती दिली. तसेच महिलांचे आजार आणि ते होऊ नये म्हणून कोणती काळजी घेणे गरजेचे आहे याबाबत माहिती दिली त्याच सोबत महिलांच्या आजारांचे उपचार करत असताना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कशी उपयुक्त ठरते व त्याच्या अटी शर्थी उपस्थितांना सविस्तर सांगितले. मा. श्रीम.आशालता जमणे (लेखाधिकारी माविम सिंधुदुर्ग), यांनी शिबिरास उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या.
आरोग्य तपासणी शिबीरामध्ये 93 महिला व पुरुषांनी सहभाग घेतला. शिबीर यशस्वी होण्यासाठी बचत गटातील महिलांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या शिबीराचे पूर्ण मार्गदर्शन व सुरवात श्री. खेमराज सावंत यांनी केली व श्रीम.सायली कांबळी यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमास जय भवानी वस्ती स्तर संघ देवूळवाडा अंतर्गत समाविष्ट SHG मधील महिला, ALF सभासद व संकल्प CLF चे सभासद उपस्थित होते.