You are currently viewing मुणगे गावचे सुपुत्र राजेंद्र मुणगेकर यांची पोलीस उपअधीक्षक पदी पदोन्नती!

मुणगे गावचे सुपुत्र राजेंद्र मुणगेकर यांची पोलीस उपअधीक्षक पदी पदोन्नती!

देवगड

देवगड तालुक्यातील मुणगे गावचे सुपुत्र राजेंद्र नारायण मुणगेकर यांची मुख्यालय ठाणे (ग्रामीण) येथे पोलीस उपअधीक्षक या पदी पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. सध्या ते ठाणे शहर येथे पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत होते.

राज्यातील १७५ पोलीस निरीक्षक या पदावरील अधिकाऱ्यांना पदोन्नतीचा शासन निर्णय २ डिसेंबर रोजी राज्य शासनाच्या गृह विभागाने जाहीर केला आहे.

राजेंद्र मुणगेकर यांनी यापूर्वी अनेक गुन्ह्यांचा यशस्वी तपास करत गुन्हेगाऱ्याना शिक्षेस पाठविले होते. आपली नोकरी सांभाळतानाच अनेकांना मदतिचा हात ते देतात. मुणगे येथील श्री भगवती हायस्कुल येथे शालेय शिक्षण झाल्या नंतर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी मुंबई येथे पूर्ण केले होते.राजेंद्र मुणगेकर यांच्या निवडी बद्दल अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा