कष्ट उपसले फार
केलं काळजाचं पाणी
माझी कष्टाळू माउली
होती गोड तिची वाणी
माया दिली पदराची
झाली बहिणींची आई
अशी कशी माय तुने
जाण्यासाठी केली घाई?
तुझी आठवण येता
काठ डोळ्यांचे भरते
लेक तुझ्या भेटीसाठी
रात दिवसा झुरते
शिकविले लेकरांना
दिली बापाची सावली
भुक्या पोटानं ज्ञानाची
ज्योत अंतरी लावली
कधी फिटणार नाही
थोर तुझे उपकार
गेली निघून वैकुंठी
सारा सोडून संसार
➖➖➖➖➖➖➖➖
*लिलाधर दवंडे*
८४१२८७७२२०