You are currently viewing जिल्हा बँक निवडणुकीसाठी महाविकासआघाडीतून सौ. अर्चना घारे-परब यांचा अर्ज दाखल

जिल्हा बँक निवडणुकीसाठी महाविकासआघाडीतून सौ. अर्चना घारे-परब यांचा अर्ज दाखल

कुडाळ

राष्ट्रवादी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा सौ.अर्चना घारे-परब यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वैयक्तिक सभासद प्रतिनिधी मतदारसंघ आणि महिला या २ मतदारसंघातून त्यांनी आपली उमेदवारी त्यानी दाखल केली. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार हा अर्ज निवडणूक अधिकारी वंदना करमाळे यांच्याकडे दाखल केल्याची माहिती अर्चना घारे-परब यांनी दिली आहे. पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. या बँकेवर त्या उपाध्यक्ष या पदावर काम करत आहेत. त्यात आजच पुणे जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर अर्चना घारे-परब यांना अचानक सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची उमेदवारी दाखल करायला सांगत विरोधकांना धक्का दिला आहे. त्यामुळे अर्चना घारे-परब यांच्या रुपानं पवारांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत लक्ष घातल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हा बँक निवडणूकीत अधिक रंगत आली आहे. अर्चना घारे-परब यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, व्हिक्टर डाॅंटस, विकास सावंत, विलास गावडे, पुंडलिक दळवी, देवेंद्र टेंमकर, दर्शना बाबर-देसाई आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा