You are currently viewing वेंगुर्ले येथे 2 जानेवारी रोजी 45 वर्षावरील खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा

वेंगुर्ले येथे 2 जानेवारी रोजी 45 वर्षावरील खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा

हौशी क्रिकेट असोसिएशन वेंगुर्ले चे आयोजन

वेंगुर्ले :

हौशी क्रिकेट असोसिएशन तालुका वेंगुर्ला आयोजित 45 वर्षावरील खेळाडूंसाठी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादीत क्रिकेट स्पर्धा रविवार 2 जानेवारी 2022 रोजी वेंगुर्ले नगरपरिषद कॅम्प मैदान येथे आयोजीत केल्या आहेत.

या स्पर्धेत जिल्हयातील 45 वर्षा वरील प्रत्येक तालुक्यामधून एक संघ खेळणार आहे. स्पर्धा सकाळी ठीक 8.30 वाजता सुरु होईल, तरी सर्व संघानी वेळेत हजर रहावे. स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघासाठी आकर्षक चषक ठेवण्यात आले आहेत.तरी अधिक माहितीसाठी असोसिएशनचे अध्यक्ष बाळू खामकर मोबा. 9422055039 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × one =