You are currently viewing बस्ती ( पंचकर्म) भाग ३

बस्ती ( पंचकर्म) भाग ३

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या बियोंड सेक्स या प्रसिद्ध कादंबरीच्या लेखिका, मॉडेल, सोनल गोडबोले यांचा लेख

खरं तर डॉक्टर मंडळीनी यावर लिहिणं अपेक्षित आहे पण आपल्याकडे चांगल्या गोष्टीचं मार्केटिंग केलं जात नाही. २ भाग वाचल्यावर बस्ती म्हणजे काय असे मेसेज आलेत ..
बस्ती म्हणजे पंचकर्मातील एक प्रकार.. ती किती दिवस करावी हे त्या व्यक्तीवर आणि डॉक्टर यांच्यावर अवलंबुन असते. मी दरवर्षी ७ दिवस करते.. यात एक दिवस काढा आणि एक दिवस तेल याचा बस्ती असतो..
सगळ्यात आधी पोटाला आणि कंबरेला तेल लावुन मसाज केला जातो आणि वाफ दिली जाते कारण आयुर्वेदात मसाज ला खुप महत्व आहे. आपली आजी आई आंघोळीच्या आधी रोज अंगाला तेल लावतात हलका मसाज करतात आणि आंघोळ करुन कोवळ्या उन्हात बसायचे . त्यांना ही समज कुठुन आली असेल याचा विचार करायलाच हवा. त्यानंतर कॅथेटॉर( रबरी नळी) द्वारे गुदद्वारातुन तेल आणि जवळपास लिटरभर काढा सोडला जातो त्यामुळे प्रेशर येउन फ्लशींग होते आणि आतुन पोटाचे oling cleaning होते . जे आपण गाडीचे करतो किवा विकत घेतलेल्या वस्तु जपतो पण शरीर फुकट असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. वरुन मेकअप किवा गोरी कातडी हवी म्हणणारे आपण आत पोटात किती घाण असते ते बस्ती केल्यावर समजते. ज्यांचं मन आणि शरीर स्वच्छ ती व्यक्ती उत्साही आणि हवीहवीशी वाटते.. प्रत्येकाच्या आसपास आयुर्वेदीक डॉक्टर असतील आणि पंचकर्म स्पेशालिस्ट असतात त्यांच्याकडुन तुम्हांला याबद्दल अधिक माहीती मिळु शकेल..याचे फायदेच फायदे आहेत.. स्कीन प्रॉब्लेम दुर होतात.. पिंपल्स असलेल्या तरुण वयातील मुलामुलीनीही जरुर करावी.. मुळव्याध , उष्णता, पित्त , शरीरावर नॅचरल ग्लो फेशीयल ने नाही तर यानेच येतो.. या जोडीला घरचं अन्न आणि व्यायाम हा हवाच.. गरज असेल तेव्हाच होटेलचं खा आणि तिथेही सॅलड सुप पनीर या गोष्टी जास्त खाल्या तर बॅलन्स होतो..
सोच बदलो.. देश बदलेगा..

सोनल गोडबोले
लेखिका.. बियॉन्ड सेक्स कादंबरी

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × five =