You are currently viewing आरोन्दा पोलीस दुरक्षेत्राच्या हद्दीत कोंडुरा जत्रोत्सवात जुगाराची मैफिल

आरोन्दा पोलीस दुरक्षेत्राच्या हद्दीत कोंडुरा जत्रोत्सवात जुगाराची मैफिल

लाड करणाऱ्या माजी लोकप्रतिनिधींने ठरवली बैठक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जत्रोत्सवात जुगारांच्या बैठकींवर पोलीस प्रशासनाचा अंकुश नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मळेवाड-कोंडुरा ग्रामपंचायत हद्दीत कोंडुरा येथे आज जत्रोत्सव असून जत्रोत्सवात परिसरातील एका सत्ताधारी पक्षाचा माजी लोकप्रतिनिधी असणाऱ्या व्यक्तीने कोंडुरा येथील देवळाच्या लगतच्या पालये येथून आलेल्या रमल्याच्या घराच्या टेरेसवर बैठक ठरविली असून मैफिल सजली आहे.
सावंतवाडी पंचायतीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेल्या जबाबदार व्यक्तीने जुगाराची बैठक आयोजित करणे म्हणजे शरमेची बाब असून अशा व्यक्तीला पोलीस प्रशासनाने लाड करून डोक्यावर बसविण्यापेक्षा केर काढायला ठेवलं पाहिजे. कोंडुरा येथे बसलेल्या बैठकीत मोठ्या प्रमाणात शेजारील गोवा राज्यातील जुगारांच्या खेळींची उपस्थिती असल्याची माहिती समोर येत आहे. काहीच दिवसांपूर्वी याच ठिकाणी पडवीत जुगार खेळताना आठ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. जत्रेत जुगार बसल्याने देव कार्यात विटंबना तर होतेच परंतु गावाची बदनामी होते, त्याचबरोबर युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर अशा अवैध धंद्यांकडे वळण्याची शक्यता जास्त असते.
पोलीस प्रशासनाने जत्रोत्सवात बसणाऱ्या जुगारांची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − twelve =